मराठ्यांचा
इतिहास हा केवळ ढाल तलवारीचा नसून तो बुद्धिमत्तेचा आणि रचनात्मक
कार्याचाही आहे, परंतु इतिहासाचे लेखन करणार्यांनी मात्र मराठ्यांच्या
इतिहासाचे अत्यंत भडक असे चित्रण केलेले आहे. मराठ्यांचा इतिहास म्हणजे
केवळ कत्तलींचाच इतिहास वाटावा एवढे या
इतिहासाचे स्वरूप लाल भडक रंगविण्यात आलेले आहे. खुद्द छत्रपती शिवरायांचेच
उदाहरण घेतल्यास असे लक्षात येते की आम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही की
शिवाजी महाराज कधी तरी घोड्यावरून खाली उतरले असतील, त्यांनी आपल्या
हातातील तलवार बाजूला ठेवली असेल आणि स्वराज्याची घडी नीट नेटकी बसविण्याचे
प्रयत्न केले असतील. परंतु जसजसे नवनवीन संशोधन होत आहे तसतसे
मराठ्यांच्या इतिहासाचे नीर निराळे पैलू समोर येऊ लागले आहेत. शिवरायांनी
स्वराज्य शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी लढाया तर केल्याच पण त्याबरोबरच
त्यांनी वेतन पद्धती सुरू केली, शेतकर्यांना शेत जमिनी कसण्यासाठी
प्रोत्साहन दिले, आरमार दलाची स्थापना केली, रस्ते सुधारले, धरणे बांधली,
वृक्षांची काळजी घेतली, पाण्याच्या नियोजनावर भर दिला, बालकांची काळजी
घेतली, स्थापत्यशास्त्र विकसित केले, राजव्यवहार कोश बनवून घेतला, आयात
निर्यातीचे धोरण निश्चित केले, परराष्ट्र धोरण ठरविले, स्त्रियांच्या
सन्मानाची आणि सुरक्षेची काळजी घेतली, मुद्रणकला आत्मसात करण्याचे पर्यटन
केले इत्यादी असे अनेक लोकोपयोगी कार्य शिवरायांनी केवळ त्यांच्या ३०
वर्षांच्या कार्यकाळात करून ठेवलेली आहेत, परंतु यावर सखोल असे संशोधन आजही
झालेले नाही. नव्या पिढीतील तरुण संशोधकांनी शिवरायांच्या या एकेक पैलूचा
सखोल अभ्यास करून दुर्लक्षित इतिहास पुढे आणण्याची गरज आहे.
देशभरातील जनतेत राष्ट्रभावनेचे स्फुल्लिंग चेतविण्याचे कार्य मराठ्यांनी केले, परंतु नवीन संशोधनानुसार खाद्य संस्कृतीतही मराठ्यांचे फार मोठे योगदान आहे असे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत संपूर्ण भारतात हाच समज होता की इडली, डोसा, वडा इत्यादी खाद्य पदार्थांचा जीव की प्राण असणारे सांबर हा पदार्थ दाक्षिणात्यांची देणगी आहे, परंतु हे खरे नसून जगभरातील खवय्यांना भुरळ घालणार्या सांबराचा शोध लावणारेही मराठेच आहेत असे नुकतेच सिद्ध झाले आहे. दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासिका पद्मिनी नटराजन यांनी नुकत्याच दिलेल्या पुणे भेटीत एका मराठी वर्तमानपत्राशी बोलताना उपरोक्त इतिहास स्पष्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी तामिळनाडू येथील तंजावर येथे मराठी राज्याचा विस्तार केला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला व्यंकोजी राजांचे वंशज असणार्या शहाजी राजे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा शाही मुदपाकखान्यात सांबार बनविण्यात आले, असा संदर्भ तमिळ लोकसाहित्यात सापडतो असे नटराजन यांचे म्हणणे आहे. तूरडाळ ही प्रामुख्याने उत्तर भारतातील आहे. मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे सर्वप्रथम दाक्षिणात्यांना तूरडाळीची ओळख झाली. पूर्वी कदाचित इतर डाळींपासून सार तयार करण्यात येत असावे, पण तूरडाळीपासून सांबर तयार करण्यात येत असल्याचा उल्लेख अठराव्या शतकाच्यापूर्वी आढळत नाही असेही पद्मिनी नटराजन यांनी सांगितले.
नटराजन यांच्या म्हणण्यानुसार सांबर या नावाची उत्पत्तीच मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे आहे. सांबर नाव हे कसे पडले याचे स्पष्टीकरण देताना पद्मिनी नटराजन म्हणाल्या की- तूरडाळीची आमटी हा मराठा राजांच्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ होता. एकदा तंजावरचे शहाजीराजे यांच्याकडे त्यांचे चुलत बंधू संभाजीराजे मेजवानीसाठी येणार होते, परंतु अचानक आमसुले संपल्याने स्वयंपाक्याने त्याऐवजी तंजावुरात मुबलक असलेली चिंच वापरली. उपस्थितांना आमटीमधील आमसुलाऐवजी चिंच हा बदल आवडला. संभाजीराजे हे मेजवानीचे खासे पाहुणे असल्यामुळे या विशेष आमटीला संभाजी आमटी असे नाव दिले गेले. आमटीलाच सार असेही म्हटले जाते. त्याचेच पुढे संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबार असे नाव रुढ झाले. आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागात येतात. या झाडाच्या फळांना कोकम आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण किंवा भाजीला आंबटपणा येण्यासाठी प्रामुख्याने आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी असते, परंतु आमसूल अचानक संपल्यामुळे स्वयंपाक्याने त्याऐवजी चिंच वापरली आणि जगभरातील खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणार्या स्वादिष्ट अशा संभाजी सारमचा-सांबराचा शोध लागला.
असे असताना आज खाद्य संस्कृतीत मराठ्यांचे काय स्थान आहे याकडे नजर टाकल्यास आपल्या हाती निराशाच येईल. राज्यात हॉटेलिंग क्षेत्रात किती मराठी लोक आहेत हा संशोधनाचा विषय आहे. देशभर राष्ट्रीय महामार्गाने फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे रस्तोरस्ती पंजाब ढाबा, लुधियाना ढाबा, हरियाना ढाबा, अमृतसर ढाबा, इत्यादी अमराठी हॉटेल्स आढळतात तर देशातील प्रमुख शहरात गल्लोगल्ली दाक्षिणात्य आणि उडुपी अशी अमराठी हॉटेल्स आढळतात. अलीकडे चायनीज खाद्यपदार्थांनी चांगलेच मार्केट काबीज केलेले आहे. मिठाईच्या मोठमोठ्या दुकानांपासून ते रस्त्याच्या कडेला मिळणार्या भेळ-पाणीपुरीपर्यंत महाराष्ट्रातील मराठी माणसांचा ठसा कुठेच उमटलेला दिसत नाही. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बर्याच शहरात मराठा हॉटेल्स नावाने चालणारी हॉटेल्ससुद्धा मराठ्यांची नसून अमराठी लोकांचीच आहेत. ज्या सांबराच्या जोरावर दाक्षिणात्य पदार्थ जगभर पोचले ते सांबर महाराष्ट्राची देन आहे म्हटल्यावर तरी मराठी भाषिक लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडायला हरकत नसावी. खाद्य बाजारावर मराठी मुद्रा उमटविण्याची स्वप्ने त्याला पडायला हवी. उलट वास्तव चित्र आणखीनच भीषण आहे. आमची मराठ्याची पोरे दिसतात ती हॉटेलमध्ये फडके घेऊन टेबल साफ करताना. त्यांच्याच पूर्वजांनी शोध लावलेल्या सांबराच्या वाट्याच्या वाट्या गिर्हाईकाच्या पुढ्यात ओतताना, श्रीमंतांनी खाल्लेली खरकटी भांडे धुताना. म्हणून किमान आत्तापासून तरी आपल्याला हॉटेल मालक व चालक बनण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. नाहीतरी पंचतारांकित हॉटेल्समधील कार्यक्रमांच्या वेळी आपण शिवरायांच्या मावळ्यांचा पोशाख करून मुजरे घालत आहोतच. भविष्यात हाच पोशाख परिधान करून याच हॉटेल्ससमोर आपल्याला एक वाटी सांबराची भिक मागण्याची वेळ येऊ नये. कारण इतिहासापासून धडा न घेणार्यांना इतिहास धडा शिकविल्या शिवाय राहत नाही.
संदर्भ- लोकपत्र मधून साभार

No comments:
Post a Comment