Tuesday, 21 April 2015

गुरुवर्य वा.सि.बेंद्रे

|| गुरुवर्य वा.सि.बेंद्रे ||

जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला.तोपर्यंत इब्राहीमखान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते.हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते.यावरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती.संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते.
     इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते.ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते,त्यात व्हैलेनट्यीन ह्या डच गव्हर्नरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले.इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच वखारीत तो गव्हर्नर होता.त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले.श्री. बेंद्रे यांनी मूळ चित्राचे तितक्याच आकाराचे एक छायाचित्र काढून घेतले.शिवाजीराजांचे ह्या चित्रातील कल्ले हे कोणत्याही चित्रात दिसणारे नाहीत.पांढऱ्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे.अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत.इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली.ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची देणगीच मिळाली.
     शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे "इब्राहिमखान" पुस्तकातून हटला गेला.बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासविषयक पुस्तकातून आणि घराघरातून झाली.शिक्षण संस्थांनाच काय पण शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या चित्र मागील अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नरचे लेखन याची माहिती नसेल.ह्या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे ह्यांची एक अतिशय महत्वाची कामगिरी मानावी लागेल.
     पुढे श्री बेंद्रे ह्यांनी ह्या चित्राच्या प्रसारास प्रारंभ केला.चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी इंडिया हाउस कडून परवानगी मिळवली.सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना केली.इ.स. १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्तान न.चि.केळकर ह्यांनी हे चित्र समाजापुढे आणण्यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजला.तेथे या चित्राचे समारंभपूर्वक प्रकाशन केले.पुण्याच्या शिवाजी मंदिरात प्रेक्षक आले ते त्यांच्या राजाचे खरे रूप पाहण्यासाठी.शिवाजी महाराजांचे सत्य चित्र श्री.केळकरांनी त्या दिवशी प्रकाशित केले.शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी आपल्या परदेश दौऱ्यात हस्तगत केले होते व स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले होते.श्री.बेंद्रे यांनी सर्व मराठीतील वृत्तपत्रांकडे शिवरायांचे हे चित्र पाठवले आणि सर्व भाषांतील वृत्तपत्रांनी व्हॅलेंटाईनच्या पत्रासह ते छापले.रायगडचा राजा तेव्हांपासून खऱ्या रुपात घरोघरी गेला.आज मंत्र्यांच्या खोल्यांमधून आणि सरकारी कार्यालयांतून श्री.बेंद्रे यांनी शोधून काढलेलेच शिवाजीराजांचे चित्र लावलेले असते.भारतीय चित्रकारांनी त्यांच्या विविध आकाराच्या प्रतिकृती काढल्या आहेत.याचे सर्व श्रेय श्री.वा.सी.बेंद्रे ह्यांनाच जाते.तेव्हा व्हैलेनट्इनच्या संबंधातील शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधीचा लेख(पत्र ) प्रसिद्ध करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली व मराठ्यांच्या इतिहासाला तितकेच मोलाचे योगदान दिले.

http://www.historianbendre.com/

Friday, 19 December 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे ?

मराठा सेवा संघ बदलतो आहे ?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणाऱ्या बदलाची नोंद घेणारा लेख.
लेखक – अविनाश दुधे

     महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन,त्याच दिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव,तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव.या साऱ्या उत्सवांना लाखोंची गर्दी असते.हे उत्सव आयोजित करणाऱ्या संस्था,संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात,कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते,याकडे राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना.मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने साऱ्याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे,असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात,याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता असते.मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार,विश्लेषक काहीही म्हणो,मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाहीत.
     मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल,तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं.इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या स्वत्वाची जाण सेवा संघाने करून दिली.असं म्हटलं जातं की,पोथी वाचणाऱ्या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली.ते खरंच आहे.धार्मिक पोथी,पुराणांशिवाय काही न वाचणाऱ्या समाजाला सेवा संघानं फुले,आंबेडकर वाचायला लावले.हे परिवर्तन खूप मोठं आहे.सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे.एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे.हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात.मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं.
     दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल,तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणाऱ्या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्डू ठोकला.सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले.बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बऱ्यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं.पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला.
     हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला.ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली,असा आरोप त्यांच्यावर होतो.या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्चित आहे.सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत,अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती.कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते.ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा,परंपरा मोडित काढल्या पाहिजेत,आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या,त्या साऱ्या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला.त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे.अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये,कुंकू लावू नये,बांगड्या घालू नये असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे.हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात,ते आपले देव असू शकत नाही,असेही सांगितले जात असे.हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल,पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता.तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो,हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे.
     मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे.त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ.आ.ह.साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही,कुंकू लावावे की नाही,बांगड्या घालाव्या की घालू नये,हा त्यांचा अधिकार आहे.याविषयात जबरदस्ती करता येणार नाही,अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले.सेवा संघ बदलत तर नाही ना,अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणाऱ्या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे,काहीसा सौम्य होत आहे,हे या वेळी जाणवले.कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्वभूषण पुरस्कार देतो,ही विसंगतीही अनेकांना खटकली.अर्थात,रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात.मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते.या लेखाचा तो विषय नाही.सेवा संघ बदलतो आहे का,हा मुद्दा आहे.
     या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्चितपणे बदलत आहे,हे मान्य केले.मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते.एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं,ज्यांनी वर्णव्यवस्था,जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे,लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे,नाकारली पाहिजे,या मताचा होता.दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा,प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात.तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात.त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत.माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात.त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे,या मताचा होता.कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे,असेही हा गट आग्रहाने सांगत होता.शेवटी डॉ.आ.ह.साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास,धर्म,संस्कृती,समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे,त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले.
     डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे.त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, ‘लढाई ही ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती.संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे.त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,’ असे सांगितले.हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे.विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणाऱ्या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे.त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे.बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो,शेवटी ती नुकसानच करते.त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल,तर त्याचं स्वागतच करायला हवं.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

प्रकाशित: दै.पुण्यनगरी १६ जानेवारी २०१४
===============================

Wednesday, 17 July 2013

रामजी पांगेरा..

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा.
हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर
थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ
घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती.
ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला.
तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला
समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय ,
जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी
बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे
घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच…
वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा
आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता.
अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,
मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.

कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.
त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव
माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही
आज.कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल.
अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा
त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल..

मराठ्यांची खाद्यसंस्कृती..

मराठ्यांचा इतिहास हा केवळ ढाल तलवारीचा नसून तो बुद्धिमत्तेचा आणि रचनात्मक कार्याचाही आहे, परंतु इतिहासाचे लेखन करणार्‍यांनी मात्र मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत भडक असे चित्रण केलेले आहे. मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ कत्तलींचाच इतिहास वाटावा एवढे या इतिहासाचे स्वरूप लाल भडक रंगविण्यात आलेले आहे. खुद्द छत्रपती शिवरायांचेच उदाहरण घेतल्यास असे लक्षात येते की आम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही की शिवाजी महाराज कधी तरी घोड्यावरून खाली उतरले असतील, त्यांनी आपल्या हातातील तलवार बाजूला ठेवली असेल आणि स्वराज्याची घडी नीट नेटकी बसविण्याचे प्रयत्न केले असतील. परंतु जसजसे नवनवीन संशोधन होत आहे तसतसे मराठ्यांच्या इतिहासाचे नीर निराळे पैलू समोर येऊ लागले आहेत. शिवरायांनी स्वराज्य शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी लढाया तर केल्याच पण त्याबरोबरच त्यांनी वेतन पद्धती सुरू केली, शेतकर्‍यांना शेत जमिनी कसण्यासाठी प्रोत्साहन दिले, आरमार दलाची स्थापना केली, रस्ते सुधारले, धरणे बांधली, वृक्षांची काळजी घेतली, पाण्याच्या नियोजनावर भर दिला, बालकांची काळजी घेतली, स्थापत्यशास्त्र विकसित केले, राजव्यवहार कोश बनवून घेतला, आयात निर्यातीचे धोरण निश्चित केले, परराष्ट्र धोरण ठरविले, स्त्रियांच्या सन्मानाची आणि सुरक्षेची काळजी घेतली, मुद्रणकला आत्मसात करण्याचे पर्यटन केले इत्यादी असे अनेक लोकोपयोगी कार्य शिवरायांनी केवळ त्यांच्या ३० वर्षांच्या कार्यकाळात करून ठेवलेली आहेत, परंतु यावर सखोल असे संशोधन आजही झालेले नाही. नव्या पिढीतील तरुण संशोधकांनी शिवरायांच्या या एकेक पैलूचा सखोल अभ्यास करून दुर्लक्षित इतिहास पुढे आणण्याची गरज आहे.
देशभरातील जनतेत राष्ट्रभावनेचे स्फुल्लिंग चेतविण्याचे कार्य मराठ्यांनी केले, परंतु नवीन संशोधनानुसार खाद्य संस्कृतीतही मराठ्यांचे फार मोठे योगदान आहे असे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत संपूर्ण भारतात हाच समज होता की इडली, डोसा, वडा इत्यादी खाद्य पदार्थांचा जीव की प्राण असणारे सांबर हा पदार्थ दाक्षिणात्यांची देणगी आहे, परंतु हे खरे नसून जगभरातील खवय्यांना भुरळ घालणार्‍या सांबराचा शोध लावणारेही मराठेच आहेत असे नुकतेच सिद्ध झाले आहे. दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासिका पद्मिनी नटराजन यांनी नुकत्याच दिलेल्या पुणे भेटीत एका मराठी वर्तमानपत्राशी बोलताना उपरोक्त इतिहास स्पष्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी तामिळनाडू येथील तंजावर येथे मराठी राज्याचा विस्तार केला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला व्यंकोजी राजांचे वंशज असणार्‍या शहाजी राजे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा शाही मुदपाकखान्यात सांबार बनविण्यात आले, असा संदर्भ तमिळ लोकसाहित्यात सापडतो असे नटराजन यांचे म्हणणे आहे. तूरडाळ ही प्रामुख्याने उत्तर भारतातील आहे. मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे सर्वप्रथम दाक्षिणात्यांना तूरडाळीची ओळख झाली. पूर्वी कदाचित इतर डाळींपासून सार तयार करण्यात येत असावे, पण तूरडाळीपासून सांबर तयार करण्यात येत असल्याचा उल्लेख अठराव्या शतकाच्यापूर्वी आढळत नाही असेही पद्मिनी नटराजन यांनी सांगितले.
नटराजन यांच्या म्हणण्यानुसार सांबर या नावाची उत्पत्तीच मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे आहे. सांबर नाव हे कसे पडले याचे स्पष्टीकरण देताना पद्मिनी नटराजन म्हणाल्या की- तूरडाळीची आमटी हा मराठा राजांच्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ होता. एकदा तंजावरचे शहाजीराजे यांच्याकडे त्यांचे चुलत बंधू संभाजीराजे मेजवानीसाठी येणार होते, परंतु अचानक आमसुले संपल्याने स्वयंपाक्याने त्याऐवजी तंजावुरात मुबलक असलेली चिंच वापरली. उपस्थितांना आमटीमधील आमसुलाऐवजी चिंच हा बदल आवडला. संभाजीराजे हे मेजवानीचे खासे पाहुणे असल्यामुळे या विशेष आमटीला संभाजी आमटी असे नाव दिले गेले. आमटीलाच सार असेही म्हटले जाते. त्याचेच पुढे संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबार असे नाव रुढ झाले. आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागात येतात. या झाडाच्या फळांना कोकम आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण किंवा भाजीला आंबटपणा येण्यासाठी प्रामुख्याने आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी असते, परंतु आमसूल अचानक संपल्यामुळे स्वयंपाक्याने त्याऐवजी चिंच वापरली आणि जगभरातील खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणार्‍या स्वादिष्ट अशा संभाजी सारमचा-सांबराचा शोध लागला.
असे असताना आज खाद्य संस्कृतीत मराठ्यांचे काय स्थान आहे याकडे नजर टाकल्यास आपल्या हाती निराशाच येईल. राज्यात हॉटेलिंग क्षेत्रात किती मराठी लोक आहेत हा संशोधनाचा विषय आहे. देशभर राष्ट्रीय महामार्गाने फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे रस्तोरस्ती पंजाब ढाबा, लुधियाना ढाबा, हरियाना ढाबा, अमृतसर ढाबा, इत्यादी अमराठी हॉटेल्स आढळतात तर देशातील प्रमुख शहरात गल्लोगल्ली दाक्षिणात्य आणि उडुपी अशी अमराठी हॉटेल्स आढळतात. अलीकडे चायनीज खाद्यपदार्थांनी चांगलेच मार्केट काबीज केलेले आहे. मिठाईच्या मोठमोठ्या दुकानांपासून ते रस्त्याच्या कडेला मिळणार्‍या भेळ-पाणीपुरीपर्यंत महाराष्ट्रातील मराठी माणसांचा ठसा कुठेच उमटलेला दिसत नाही. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बर्‍याच शहरात मराठा हॉटेल्स नावाने चालणारी हॉटेल्ससुद्धा मराठ्यांची नसून अमराठी लोकांचीच आहेत. ज्या सांबराच्या जोरावर दाक्षिणात्य पदार्थ जगभर पोचले ते सांबर महाराष्ट्राची देन आहे म्हटल्यावर तरी मराठी भाषिक लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडायला हरकत नसावी. खाद्य बाजारावर मराठी मुद्रा उमटविण्याची स्वप्ने त्याला पडायला हवी. उलट वास्तव चित्र आणखीनच भीषण आहे. आमची मराठ्याची पोरे दिसतात ती हॉटेलमध्ये फडके घेऊन टेबल साफ करताना. त्यांच्याच पूर्वजांनी शोध लावलेल्या सांबराच्या वाट्याच्या वाट्या गिर्‍हाईकाच्या पुढ्यात ओतताना, श्रीमंतांनी खाल्लेली खरकटी भांडे धुताना. म्हणून किमान आत्तापासून तरी आपल्याला हॉटेल मालक व चालक बनण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. नाहीतरी पंचतारांकित हॉटेल्समधील कार्यक्रमांच्या वेळी आपण शिवरायांच्या मावळ्यांचा पोशाख करून मुजरे घालत आहोतच. भविष्यात हाच पोशाख परिधान करून याच हॉटेल्ससमोर आपल्याला एक वाटी सांबराची भिक मागण्याची वेळ येऊ नये. कारण इतिहासापासून धडा न घेणार्‍यांना इतिहास धडा शिकविल्या शिवाय राहत नाही.

संदर्भ- लोकपत्र मधून साभार
 

हिरकणी...


गोपनारी हिरकणी गडा गेली
दूध घालाया परत झणी निघाली
पायथ्याशी ते वसे तीचे गाव
घरी जाया मन घेई पार धाव ll ध्रु ll

शिवप्रभुंचा निर्बंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ-न-येऊ द्यावे ll १ ll

सर्व दरवाजे फिरून परत आली
तिला भेटे ना तेथ कुणी वाली
कोण पाजील तरी तान्हुल्यास आता
विचारे या बहुदु:ख होय चित्ता ll २ ll

मार्ग सुचला आनंद फार झाला
निघे वेगे मग घरी जावयाला
नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा
तेथ होता पथ रायागादी खासा ll ३ ll

गडा तुटलेला कडा उंच नीट
घरी जाया उतरली पायवाट
पाय चुकता नेमका मृत्यु येई
परी माता ती तेथुनीच जाई ll ४ ll

उतरू लागे मन घरी वेधलेले
शुद्ध नाही जरी तनुस लागलेले
अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले
अशा वेषे ती घराप्रती चाले ll ५ ll

वृत्त घडले शिवभूप कर्णि जाता
वदे आनंदे धन्य धन्य माता
कड्या वरती त्या बुरुज बंधियेला
नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला ll ६ ll
----------------------------------------------------------

।। एक आवाज एकच पर्याय ।।
।। जय जिजाऊ जय शिवराय ।।
 

छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण...


छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन जवळपास ३३४ वर्षे उलटली तरीही त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची आठवण झाल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. छ.शिवाजी महाराजांनी  स्वराज्याची महाराष्ट्रात पायाभरणी करून भारताला ‘स्वराज्याचा’ पहिला धडा दिला. छ.शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आकाराने लहान असले तरीही ते संपूर्ण भारतामध्ये त्याकाळी स्वतंत्र आणि सार्वभौम होते. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणून महाराष्ट्रातील अठरा पगड जातींच्या लोकांना हिन्दवी स्वराज्य हे आपलेच स्वराज्य वाटत होते. हिन्दवी स्वराज्याच्या जडण-घडणीसाठी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील प्रत्येकांनी आपले सर्वस्व छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे केले. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये हिन्दवी स्वराज्यात कधीही धार्मिक दंगल अथवा बंडखोरी झालेली दिसत नाही. धार्मिक आणि सामाजिक सलोखा हे छ. शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्याचे फार मोठे वैष्ट्यिे होते. आधुनिक काळातील धर्मनिरपेक्षता  आणि सामाजिक समायोजन  या दोन तत्वांना छ.शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासकीय धोरणाचा पाया ठरवून त्यावर हिन्दवी स्वराज्याची उभारणी केलेली होती. म्हणूनच छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण अभ्यासणे अत्यंत महत्वाचे ठरणारे आहे.

छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण :- छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे देशातील व देशाबाहेरील अनेक नामवंत इतिहासकारांनी, संशोधकांनी व अभ्यासकांनी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे. यात शंका नाही, परंतु झालेल्या संशोधनामध्ये नव्वद टक्के संशोधन हे राजकीय व प्रशासकीय क्षेत्राचेच झालेले आहे. प्रस्तुत शोधनिबंधामध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सामाजिक धोरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

१) मुसलमानांचा उचित सन्मान -
भारतीय इतिहासाच्या प्रारंभापासून भारतात ‘यथा राजा तथा प्रजा’ हा अलिखित नियम कटाक्षाने पाळला जात होता. ‘राजाचा जो धर्म असेल तो प्रजेचा धर्म’ मानला जात होता. छ.शिवाजी महाराजांच्या कार्य-कालखंडामध्ये भारतात मुस्लिम राजकर्त्यांच्या अनेक राजवटी होत्या, त्या प्रांतात कमी अधिक मुस्लिम प्रजेला झुकते माप दिले जात होते. इ.स. १६१० मध्ये मसूरच्या पाटीलकीवरून बापाजी मुसलमान व नरसोजी जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला तेव्हा तत्कालिन न्यायनिवाड्यात ‘‘नरसोजी जगदाळे यांचेच गळा पडोन त्यास कष्ट केले वतनास विक्षेप केलास ऐसा तू गुन्हेगार, तुला देहांत प्रायश्‍चित द्यावे, परंतु मुसलमानाची पातशाही तुही मुसलमान क्षमा जाली’’ असा उल्लेख आढळतो. शहाजहान याने जानेवारी १६३३ मध्ये एक आदेश काढून आपल्या साम्राज्यामध्ये नविन मंदिराच्या निर्मितीवर व जुन्या मंदिराच्या दुरूस्तीवर बंदी घातली. औरंगजेबाने ही हेच धोरण चालू ठेवले. याशिवाय त्याने मुसलमानांना सरकारी नोकरीमध्ये प्राथमिकता देण्याचे धोरण अंगिकारलेले होते. इ.स. १६६७ मध्ये चार पोलीस अधिकार्‍यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. परंतु त्यांनी इस्लाम धर्म स्विकारताच त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त करण्यात आले. ह्या सर्व उदाहरणावरून मुस्लिम राजकर्त्यांच्या राजवटीमध्ये हिन्दुना कशा पध्दतीने वागवले जात होते, याची कल्पना येते.
छ.शिवाजी महाराजांनी मात्र स्वराज्यातील परधर्मिय असलेल्या मुसलमानांना अत्यंत सन्मानाने वागवल्याचे दिसून येते. केळशी जि. रत्नागिरी येथील चाकूत बाबा ह्यांना छ.शिवाजी महाराज आपल्या गुरूस्थानी मानत असत. त्यांनी चाकूत बाबाच्या दर्ग्यास उद, फुल, दिवाबत्ती आणि येथील फकिरांची सोय व्हावी म्हणून ६५३ एकर जमीन अग्रहार म्हणून दिल्याचा उल्लेख एका आज्ञापत्रात आढळतो. इ.स. १६५२ मध्ये पेडगावच्या कुलकर्णी वतनाचा वाद निर्माण झाला तेव्हा बोलावण्यात आलेल्या न्यायसभेमध्ये सैय्यद महेमूद शेख इमामखान, समाखान मीर अलीखान आणि आगा अहमद हे चार मुसलमान सहभागी झालेले आहेत. वाद कुलकर्णी वतनाचा आणि पंच किंवा साक्षीदार म्हणून वरील चार मुसलामन आहेत. इ.स. १६५० मध्ये पाली येथील कुलकर्णी वतनाचा वाद निर्मान झाला. याही वादाच्या न्यायनिवाडाप्रसंगी आबूल रहिम मुलाना, इस्माईल देसाई, आब्दूलजी, हुसेनजी, अगामीर, महमद दलवी आणि इस्माईल अहमद यांच्या साक्षी प्रमाण मानुण त्यायदान करण्यात आले. इ.स. १६५७ च्या गुंजन मावळच्या देशमुखी वतनांचा वाद निर्मान झाला तेंव्हा ७२ वतनदार हजर हाते त्यात १० मुसलमान वतनदार हजर आहेत. हया सर्व दाखल्यावरून छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जडण-घडणीत मुसलमानांना अत्यंत सन्मानाने सहभागी करून घेतले होते. या शिवाय सिद्यी हिलालखान, मदारी मेहत्तर, नूरखान बेग, इब्राहीमखान यांनी स्वराज्याच्या लष्करामध्ये फार मोठे शौर्य गाजवलेले सर्वांना ज्ञात आहेच. सिद्यी इब्राहिम हा मुसलमान तर छ.शिवाजीराजांचा विश्‍वासू अंगरक्षक म्हणून कार्यरत होता.एकीकडे मुसलमान राजकर्त्यांचे हिंन्दु विरोधी किंवा अडवणुकीचे धोरण आणि छ.शिवाजी महाराजांचे मुसलमानाप्रति अत्यंत जिव्हाळयाचे धोरण पाहिल्यानंतर छ. शिवाजीराजांच्या स्वराज्यात सामाजिक सलोखा का होता? या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर जसे जगदिश्‍वराचे मंदिर उभारले तसेच त्यांनी आपल्या महालासमोरच मुसलमान बांधवासाठी मस्जिदीचेही बांधकाम करून सामाजिक सलोख्याचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सामाजिक सलोख्यासाठी ‘‘धर्म निरपेक्षता’’ हया तत्वाचा आधार घेतल्याचे दिसून येते.

२) जातिभेदाची तिव्रता कमी केली -भारतीय समाजातून जी कधीच जात नाही तिला ‘जात’ म्हणतात. आधुनिक काळातील म.ज्योतिराव फूले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गुरू हया समाजसुधारकांनी जाती अंतासाठी खुप मोठे कार्य केलेले आहे. यांच्या जातीअंताच्या भुमिकेतून छ.शिवाजी महाराजांकडे पाहता येणार नाही. कारण प्रत्येकाचे जीवन मुल्य वेगवेगळे असतात म्हणून एकमेकाच्या कार्याची तुलना करणे, न्यायोचित ठरत नाही. छ.शिवाजी महाराजांचे जीवन मूल्य स्वराज्याची उभारणी करून त्याचे सुराज्यात रूपातंर करणे, हे होते. त्यामुळे छ.शिवाजी महाराजाकडून जाति निर्मुलनाच्या कामाची आपेक्षा करता येणार नाही. तरीही छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना त्यांनी महाराष्ट्रातील आठरा पगड जातीच्या मानसांना स्वराज्याच्या प्रवाहामये एकत्रित आणले. स्वराज्याच्या भगव्या झेंडयाखाली सर्वांना समानतेच्या न्यायाने वागवले, ही बाब त्यांच्या सामाजिक धोरणाचे अतिधष्ठान सांगण्यास पूरेशी आहे.

छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी व उन्नतीसाठी महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लोकांनी तनमनधन अर्पन केल्याचे इतिहासात असंख्य दाखले मिळतात. त्यात कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते (मराठा), मोरोपंत पिंगळे आण्णजी दत्तो (ब्राहमण), बाळाजी आवजी , बाजीप्रभू देशपांडे (कायस्थ), जिवा महाला, शिवाजी काषिद, तान महाळा (न्हावी), लाय पाटील (कोळी), नागनाक खंडू (महार), बहिर्जी नाईक(रामोशी), नूरबेग, काझी हैदर, मदारी मेहतर, दौलतखान, सिद्दी इब्राहिम, वाहवाखान, सुलतान खान आणि सिद्दी इ्रब्राहिम (मुसलमान). हे सर्व छ.शिवाजी महाराजांचे स्वामीभक्त सेवक होते. या सार्वानी आपली ताकत छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली, प्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान दिले, म्हणूनच स्वराज्य निर्मितीचा संकल्प सिध्दीस गेला. ही आठरा पगड जातीची मानस एकत्रित करणे, हा सुध्दा छ.शिवाजी महाराजांच्या प्रगत सामाजिक धोरणाचा एक अविभाज्य घटक ठरतो. छ.शिवाजी महाराजांच्या अषा प्रकारच्या समाजिक धोरणामूळे तत्कालिन महाराष्ट्रातील जातीयतेची ताठरता किंवा तिव्रता काही प्रमाणात निश्‍चितच कमी झालेली दिसते.
 जिवा महाला, शिवाजी काशिद, लाय पाटील, बहिर्जी नाईक, नाकनाक महार, इत्यादी विविध जातीच्या लोकांच्या हातामध्ये ब्राहमणी व्यवस्थेने दिलेले उपजिवेकेचे साधने काढून टाकून, त्याच्या हातामध्ये छ. शिवाजी महाराजांनी लष्करी आवजारे दिली, यावरून शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण परिवर्तनाच्या दिशेने जाणारे होते याची खात्री पटते...
(Sabhar -Raj Jadhav, Barshi)