छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन जवळपास ३३४ वर्षे उलटली तरीही त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची आठवण झाल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची महाराष्ट्रात पायाभरणी करून भारताला ‘स्वराज्याचा’ पहिला धडा दिला. छ.शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आकाराने लहान असले तरीही ते संपूर्ण भारतामध्ये त्याकाळी स्वतंत्र आणि सार्वभौम होते. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणून महाराष्ट्रातील अठरा पगड जातींच्या लोकांना हिन्दवी स्वराज्य हे आपलेच स्वराज्य वाटत होते. हिन्दवी स्वराज्याच्या जडण-घडणीसाठी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील प्रत्येकांनी आपले सर्वस्व छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे केले. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये हिन्दवी स्वराज्यात कधीही धार्मिक दंगल अथवा बंडखोरी झालेली दिसत नाही. धार्मिक आणि सामाजिक सलोखा हे छ. शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्याचे फार मोठे वैष्ट्यिे होते. आधुनिक काळातील धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समायोजन या दोन तत्वांना छ.शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासकीय धोरणाचा पाया ठरवून त्यावर हिन्दवी स्वराज्याची उभारणी केलेली होती. म्हणूनच छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण अभ्यासणे अत्यंत महत्वाचे ठरणारे आहे.
छ.शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण :- छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे देशातील व देशाबाहेरील अनेक नामवंत इतिहासकारांनी, संशोधकांनी व अभ्यासकांनी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे. यात शंका नाही, परंतु झालेल्या संशोधनामध्ये नव्वद टक्के संशोधन हे राजकीय व प्रशासकीय क्षेत्राचेच झालेले आहे. प्रस्तुत शोधनिबंधामध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सामाजिक धोरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
१) मुसलमानांचा उचित सन्मान -
भारतीय इतिहासाच्या प्रारंभापासून भारतात ‘यथा राजा तथा प्रजा’ हा अलिखित नियम कटाक्षाने पाळला जात होता. ‘राजाचा जो धर्म असेल तो प्रजेचा धर्म’ मानला जात होता. छ.शिवाजी महाराजांच्या कार्य-कालखंडामध्ये भारतात मुस्लिम राजकर्त्यांच्या अनेक राजवटी होत्या, त्या प्रांतात कमी अधिक मुस्लिम प्रजेला झुकते माप दिले जात होते. इ.स. १६१० मध्ये मसूरच्या पाटीलकीवरून बापाजी मुसलमान व नरसोजी जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला तेव्हा तत्कालिन न्यायनिवाड्यात ‘‘नरसोजी जगदाळे यांचेच गळा पडोन त्यास कष्ट केले वतनास विक्षेप केलास ऐसा तू गुन्हेगार, तुला देहांत प्रायश्चित द्यावे, परंतु मुसलमानाची पातशाही तुही मुसलमान क्षमा जाली’’ असा उल्लेख आढळतो. शहाजहान याने जानेवारी १६३३ मध्ये एक आदेश काढून आपल्या साम्राज्यामध्ये नविन मंदिराच्या निर्मितीवर व जुन्या मंदिराच्या दुरूस्तीवर बंदी घातली. औरंगजेबाने ही हेच धोरण चालू ठेवले. याशिवाय त्याने मुसलमानांना सरकारी नोकरीमध्ये प्राथमिकता देण्याचे धोरण अंगिकारलेले होते. इ.स. १६६७ मध्ये चार पोलीस अधिकार्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. परंतु त्यांनी इस्लाम धर्म स्विकारताच त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त करण्यात आले. ह्या सर्व उदाहरणावरून मुस्लिम राजकर्त्यांच्या राजवटीमध्ये हिन्दुना कशा पध्दतीने वागवले जात होते, याची कल्पना येते.
छ.शिवाजी महाराजांनी मात्र स्वराज्यातील परधर्मिय असलेल्या मुसलमानांना अत्यंत सन्मानाने वागवल्याचे दिसून येते. केळशी जि. रत्नागिरी येथील चाकूत बाबा ह्यांना छ.शिवाजी महाराज आपल्या गुरूस्थानी मानत असत. त्यांनी चाकूत बाबाच्या दर्ग्यास उद, फुल, दिवाबत्ती आणि येथील फकिरांची सोय व्हावी म्हणून ६५३ एकर जमीन अग्रहार म्हणून दिल्याचा उल्लेख एका आज्ञापत्रात आढळतो. इ.स. १६५२ मध्ये पेडगावच्या कुलकर्णी वतनाचा वाद निर्माण झाला तेव्हा बोलावण्यात आलेल्या न्यायसभेमध्ये सैय्यद महेमूद शेख इमामखान, समाखान मीर अलीखान आणि आगा अहमद हे चार मुसलमान सहभागी झालेले आहेत. वाद कुलकर्णी वतनाचा आणि पंच किंवा साक्षीदार म्हणून वरील चार मुसलामन आहेत. इ.स. १६५० मध्ये पाली येथील कुलकर्णी वतनाचा वाद निर्मान झाला. याही वादाच्या न्यायनिवाडाप्रसंगी आबूल रहिम मुलाना, इस्माईल देसाई, आब्दूलजी, हुसेनजी, अगामीर, महमद दलवी आणि इस्माईल अहमद यांच्या साक्षी प्रमाण मानुण त्यायदान करण्यात आले. इ.स. १६५७ च्या गुंजन मावळच्या देशमुखी वतनांचा वाद निर्मान झाला तेंव्हा ७२ वतनदार हजर हाते त्यात १० मुसलमान वतनदार हजर आहेत. हया सर्व दाखल्यावरून छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जडण-घडणीत मुसलमानांना अत्यंत सन्मानाने सहभागी करून घेतले होते. या शिवाय सिद्यी हिलालखान, मदारी मेहत्तर, नूरखान बेग, इब्राहीमखान यांनी स्वराज्याच्या लष्करामध्ये फार मोठे शौर्य गाजवलेले सर्वांना ज्ञात आहेच. सिद्यी इब्राहिम हा मुसलमान तर छ.शिवाजीराजांचा विश्वासू अंगरक्षक म्हणून कार्यरत होता.एकीकडे मुसलमान राजकर्त्यांचे हिंन्दु विरोधी किंवा अडवणुकीचे धोरण आणि छ.शिवाजी महाराजांचे मुसलमानाप्रति अत्यंत जिव्हाळयाचे धोरण पाहिल्यानंतर छ. शिवाजीराजांच्या स्वराज्यात सामाजिक सलोखा का होता? या प्रश्नाचे उत्तर सापडते. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर जसे जगदिश्वराचे मंदिर उभारले तसेच त्यांनी आपल्या महालासमोरच मुसलमान बांधवासाठी मस्जिदीचेही बांधकाम करून सामाजिक सलोख्याचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सामाजिक सलोख्यासाठी ‘‘धर्म निरपेक्षता’’ हया तत्वाचा आधार घेतल्याचे दिसून येते.
२) जातिभेदाची तिव्रता कमी केली -भारतीय समाजातून जी कधीच जात नाही तिला ‘जात’ म्हणतात. आधुनिक काळातील म.ज्योतिराव फूले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गुरू हया समाजसुधारकांनी जाती अंतासाठी खुप मोठे कार्य केलेले आहे. यांच्या जातीअंताच्या भुमिकेतून छ.शिवाजी महाराजांकडे पाहता येणार नाही. कारण प्रत्येकाचे जीवन मुल्य वेगवेगळे असतात म्हणून एकमेकाच्या कार्याची तुलना करणे, न्यायोचित ठरत नाही. छ.शिवाजी महाराजांचे जीवन मूल्य स्वराज्याची उभारणी करून त्याचे सुराज्यात रूपातंर करणे, हे होते. त्यामुळे छ.शिवाजी महाराजाकडून जाति निर्मुलनाच्या कामाची आपेक्षा करता येणार नाही. तरीही छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना त्यांनी महाराष्ट्रातील आठरा पगड जातीच्या मानसांना स्वराज्याच्या प्रवाहामये एकत्रित आणले. स्वराज्याच्या भगव्या झेंडयाखाली सर्वांना समानतेच्या न्यायाने वागवले, ही बाब त्यांच्या सामाजिक धोरणाचे अतिधष्ठान सांगण्यास पूरेशी आहे.
छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी व उन्नतीसाठी महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लोकांनी तनमनधन अर्पन केल्याचे इतिहासात असंख्य दाखले मिळतात. त्यात कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते (मराठा), मोरोपंत पिंगळे आण्णजी दत्तो (ब्राहमण), बाळाजी आवजी , बाजीप्रभू देशपांडे (कायस्थ), जिवा महाला, शिवाजी काषिद, तान महाळा (न्हावी), लाय पाटील (कोळी), नागनाक खंडू (महार), बहिर्जी नाईक(रामोशी), नूरबेग, काझी हैदर, मदारी मेहतर, दौलतखान, सिद्दी इब्राहिम, वाहवाखान, सुलतान खान आणि सिद्दी इ्रब्राहिम (मुसलमान). हे सर्व छ.शिवाजी महाराजांचे स्वामीभक्त सेवक होते. या सार्वानी आपली ताकत छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली, प्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान दिले, म्हणूनच स्वराज्य निर्मितीचा संकल्प सिध्दीस गेला. ही आठरा पगड जातीची मानस एकत्रित करणे, हा सुध्दा छ.शिवाजी महाराजांच्या प्रगत सामाजिक धोरणाचा एक अविभाज्य घटक ठरतो. छ.शिवाजी महाराजांच्या अषा प्रकारच्या समाजिक धोरणामूळे तत्कालिन महाराष्ट्रातील जातीयतेची ताठरता किंवा तिव्रता काही प्रमाणात निश्चितच कमी झालेली दिसते.
जिवा महाला, शिवाजी काशिद, लाय पाटील, बहिर्जी नाईक, नाकनाक महार, इत्यादी विविध जातीच्या लोकांच्या हातामध्ये ब्राहमणी व्यवस्थेने दिलेले उपजिवेकेचे साधने काढून टाकून, त्याच्या हातामध्ये छ. शिवाजी महाराजांनी लष्करी आवजारे दिली, यावरून शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण परिवर्तनाच्या दिशेने जाणारे होते याची खात्री पटते...
(Sabhar -Raj Jadhav, Barshi)

No comments:
Post a Comment